Latest

World Health Day : आजपासून राज्यात आठवडाभर ‘सुंदर माझा दवाखाना’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमी्त्ताने सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी आजपासून (दि.७) राज्यात आठवडाभर 'सुंदर माझा दवाखाना' उपक्रम सुरू होत असल्याची घोषणा आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन केली आहे. वाचा सविस्तर बातमी. (World Health Day )

सुंदर माझा दवाखाना

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छांमध्ये म्हंटल आहे, राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्यविषयक आव्हानाला ताकदीने सामोरे जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. आजपासून राज्यात आठवडाभर 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम सुरू होत आहे, त्या माध्यमातून सामान्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

World Health Day : जागतिक आरोग्य दिन

जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना 7 एप्रिल 1948 या दिवशी झाली. त्या स्मरणार्थ इ. स. 1950 पासून 'सात एप्रिल' हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेला उद्या 75 वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी या दिनाच्या औचित्य साधून दरवर्षी एक घोषवाक्य जाहीर केले जाते. यावर्षीचे घोषवाक्य आहे 'Health for All' म्हणजे 'सर्वांसाठी आरोग्य असे आहे. 

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT