Latest

World Cup 2023 : फायनलमधील पराभव लागला जिव्हारी; दोन तरूणांनी संपवले जीवन

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि ओडिशाच्या जाजपूरमधील दोन तरूणांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेला पराभव कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. हा पराभव अनेक भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे.

भारताचा पराभव झाल्यानंतर राहुल लोहार (वय २३) याने रविवारी रात्री ११ च्या सुमारास बांकुरा येथील बेलियाटोर पोलीस स्टेशन परिसरात एका सिनेमा हॉलजवळ टोकाचे पाऊल उचलले. भारताच्या पराभवानंतर राहुलने आपल्या खोलीत गळफास लावून घेतला, असे राहुल याचे मेहुणे उत्तम सूर यांनी सांगितले. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी बांकुरा संमिलानी वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची अनैसर्गिक मृत्यू अशी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

ओडिशाच्या जाजपूरमध्ये, रविवारी रात्री सामना संपल्यानंतर बिंझारपूर भागात देव रंजन दास (वय २३) या तरूणाचा मृतदेह त्याच्या घराच्या टेरेसवर लटकलेल्या अवस्थेत सापडला.

SCROLL FOR NEXT