Latest

Winter session 5th day : शौचालयाच्या प्रवेशद्वारावरच ज्यूस सेंटरची फळं स्वच्छ! नागपूर विधीमंडळ परिसरातील आणखी एक व्हिडिओ समोर

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (दि. १९) सुरु झालं आहे. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच हे अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान, विधीमंडळ परिसरातील ज्यूस सेंटरची काय दशा आहे, हे आमदार अमोल मिटकरी यांनी आणखी एक व्हिडिओ ट्विट करून, समोर आणले आहे. 

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन चर्चेत आहे. (Winter session 5th day ) अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदार यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. आमदार निवासस्थानातील उपहारगृहात आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून टॉयलेट मधील बेसीनचा वापर केलेला व्हिडिओ समोर आला होता. आता आणखी एक व्हिडिओ समोर येत आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. (पाहा व्हिडिओ)

Winter session 5th day : आणखी एक व्हिडिओ समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील गैरसोयीबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करत सत्ताधारी सरकारवर टीका केली होती. आमदार निवासस्थानातील या व्हिडिओचे पडसाद असतानाच आणखी एक व्हिडिओ समोर  आला आहे. हा व्हिडिओ अमोल मिटकरी यांनी  ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. "नागपूर विधीमंडळ परिसरातील ज्यूस सेंटर परिसरातील धक्कादायक प्रकार शौचालयाच्या प्रवेशद्वारावर ज्यूस सेंटरची फळं स्वच्छ केली जातात. हिवाळी अधिवेशनात अनेक आमदार आणि अधिकारी या सेंटरवरुन ज्यूस घेतात. शौचालयाच्या बाहेर संत्र्याची साल काढली जाते आणि इतर फळं स्वच्छ केली जातात" असं लिहित त्यांनी एक व्हिडिओ ट्विट  केला आहे.

या २० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ज्यूस सेंटर पुरुष प्रसाधन गृहाजवळच संत्र्याची साल काढली जाते आणि इतर फळं स्वच्छ केली जात आहेत हे दिसत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT