Food & Festival : खवय्यांसाठी मेजवाणी व शॉपिंग प्रेमींसाठी खास व्हरायटी! कुठे? फक्त ‘पुढारी’ कस्तुरी क्लब शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलमध्ये आजपासून

Food & Festival : खवय्यांसाठी मेजवाणी व शॉपिंग प्रेमींसाठी खास व्हरायटी! कुठे? फक्त ‘पुढारी’ कस्तुरी क्लब शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलमध्ये आजपासून

Published on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Food & Festival : 'रुचकर व लज्जतदार पदार्थांची चव चाखण्याबरोबरच मनसोक्त खरेदीचा महोत्सव अर्थात 'पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल' आज (दि. 23) सकाळी 11 पासून सुरू होत आहे. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते शाहूपुरी येथील आयर्विन ख्रिश्चन ग्राऊंड येथे या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून या निमित्ताने खाद्य, खरेदी आणि धमाल आता एकाच छताखाली करता येणार आहे. महोत्सवाचे सहप्रायोजक रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर, मीडिया पार्टनर कलर्स मराठी, तर आईस्क्रीम पार्टनर क्रेझी आईस्क्रीम असणार आहे.

Food & Festival : 'महोत्सवात अनेकविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासोबत चोखंदळ खरेदीला साजेशा अशाच वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. काही वस्तूंवर आकर्षक बक्षिसे, ऑफर्स, फ्री गिफ्टस्, लाईव्ह डेमो असणार आहेत. चिमुकल्यांसाठी अम्युझमेंट पार्कची धमालही असणार आहे. मंगळवार, दि. 27 अखेर सुरू राहणार्‍या या महोत्सवात दररोज बहारदार कार्यक्रमांचे आयोजन असणार असून सोबतीलाच कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिकेतील कलाकारही भेट देणार आहेत.

Food & Festival : 'महोत्सवाला भेट देणार्‍या कोल्हापूरकरांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची खरेदी सोपी आणि सुटसुटीत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news