Latest

कर्तव्यात कसूर करणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे चौकशीची जबाबदारी का? : प्रकाश आंबेडकर

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाऊन डेस्क : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरून बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज (बुधवार) पत्रकार पऱिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला. कर्तव्यात कसूर ठेवली, त्या अधिकाऱ्यांवर चौकशीची जबाबदारी का दिली? याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करण्याची मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली.

मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर आहे. परंतु, शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्याने ही जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली नसल्याचे दिसून येत आहे. पवारांच्या घरावर हल्ला होणार असल्याचे गुप्तहेर विभागाने चार दिवस आधी पोलिसांना कळवले होते. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी नांगरे- पाटील जबाबदार असताना या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी त्यांच्याकडे का देण्यात आली, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशीही मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT