पुढारी ऑनलाईन डेस्क
1) जर तुम्ही एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे अॅडमिन असाल आणि तुम्ही किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपमधील केणत्याही सदस्याने बेकायदेशीर बाब शेअर केली असेल तर तुम्हाला जेलची हवा मिळू शकते.
2) चूकनही कधी ही चूक करू नका. अश्लील क्लिप, चाइल्ड पोर्न, इमेज संदर्भात काही शेअर केल्यास कडक कारवाई होवू शकते.
3) एखाद्या महिलेने आपल्याला व्हॉट्सअॅपवर एखाद्या व्यक्तीने अश्लील माहिती पाठवली आहे अशी तक्रार केल्यास त्याला अटक होवू शकते
4) व्हॉट्सअॅपवर कोणत्याही सदस्याने मॉर्फेड फोटोज आणि छेडछाड केलेले व्हिडिओ शेअर केल्यास अटक होते.
5) धर्म आणि पुजा या धार्मिक बाबींना धक्का बसतील असा कोणताही फोटो आणि छेडछाड केलेले व्हिडिओ शेअर केल्यास अटक होवू शकते.
6) जर का तुम्ही व्हॉट्सअॅप इतर कोणाच्या नावाने काढून वापरत असाल तर तो गुन्हा आहे. ही बाब महागत पडू शकते.
8) आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करणे हे सुध्दा महागात तुम्हाला पडेल .
9 ) व्हॉट्सअॅपचा वापर जर ड्रग्ज किंवा इतर अन्य प्रतिबंधित वस्तु, पदार्थ विकण्यासाठी जर व्हॉट्सअॅपचा वापर एखादी व्यक्ती करत असेल तर हे लक्षात आल्यास त्या व्यक्तीला अटक होवू शकते.
हेही वाचा;