Latest

डेल्मिक्रॉन : डेल्टा, ओमायक्रॉनच्या संयोगातून काय होईल? शास्त्रज्ञांनी दिला इशारा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

कोरोना व्हायरसचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा जगभरात वेगाने प्रसार होत आहे. डेल्टाच्या (delta) तुलनेत या विषाणूमुळे गंभीररीत्या प्रकृती बिघडण्याची उदाहरणे कमी असली तरी ओमायक्रॉनचा (omicron) वेग फार जास्त आहे. तर डेल्टाची लागण झाली तर प्रकृती गंभीर होण्याची शक्यता जास्त असते.

ही स्थिती असताना काही संशोधकांनी डेल्मिक्रॉनचा (delimicron) इशाराही दिलेला आहे. सर्वसाधारण एकाच प्रकारच्या व्हेरिएंटची लागण जास्त होते. पण काही वेळा दोन्ही व्हेरिएंटची लागण होऊ शकते असा इशारा संशोधकांनी दिलेले आहे.

मॉडर्नचे मुख्य संशोधक अधिकारी डॉ. पॉल बर्टन म्हणाले, "जर एकाच वेळी ओमायक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटची लागण झाली तर सुपरव्हॅरिएंटीचा जन्म होऊ शकतो." Financial Express या वेबसाईटने या संदर्भात सविस्तर वृत्त दिले आहे.

डेलीमेल या वेबसाईटला बर्टन यांनी ही मुलाखत दिलेली आहे. "ज्यांची प्रतिकारक्षमता क्षतीग्रस्त आहे, त्यांच्यात दोन्ही व्हायरसची लागण होऊ शकते, असे दक्षिण आफ्रिकेतून प्रसिद्ध झालेल्या काही पेपरमधून दिसते."

डेल्मिक्रॉन हा व्हायरस डेल्टा आणि ओमायक्रॉनपेक्षा वेगळा असेल, हा फरक विशेष करून त्यातील स्पाईक प्रोटिनमधला आहे.
द फर्स्ट पोस्ट या वेबसाईटने महाराष्ट्र राज्याच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्या हवाल्याने याबद्दलची माहिती दिलेली आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या ट्विन स्पाईक प्रोटिनच्या एकत्रिकरणातून तयार झालेला व्हायरस म्हणजे डेल्मिक्रॉन असे, डॉ. जोशी यांनी म्हटलेले आहे.

डेल्मिक्रॉनची लक्षणे काय आहेत?

  • जास्त ताप
  • सततचा खोकला
  • वास आणि चव न समजणे
  • सर्दी
  • डोकेदुखी
  • घसा खवखवणे

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT