Latest

IPL 2023 : सनरायझर्स हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकपदी वेस्ट इंडिजच्या ‘या’ महान फलंदाजाची नियुक्ती

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी आयपीएल (IPL) हंगामात विजेतेपद पटकवण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (SRH) आपल्या संघ अनेक बदल करण्याच्या तयारीत आहे. सनरायझर्स फ्रँचायझीने आपले प्रशिक्षक टॉम मूडी यांच्याशी असलेला दोघांमधील करार संपला आहे. नवीन करारामध्ये फ्रँचायझीने सनरायझर्स हैदराबाद वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. (IPL 2023)

इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ सनरायझर्स हैदराबाद (SRH) पुढील हंगामात विजेतेपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. याची तयारी म्हणून संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरी वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांची नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडी आणि सनरायझर्स हैदराबाद संघ यांच्यातील करार संपला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांनी परस्पर सहमतीने एकमेकांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.(IPL 2023)

सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने ही जबाबदारी वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा याच्याकडे सोपवली आहे. लारा गेल्या मोसमात सनरायझर्स संघाचा धोरणात्मक सल्लागार (Strategic Advisor) आणि फलंदाजी प्रशिक्षक होता. टॉम मूडी यांच्याशी असलेला करार संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लाराची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.

सनरायर्जस हैदराबादसोबत टॉम मूडी

टॉम मूडी यांनी 2013 ते 2019 पासून सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक पदाचे काम पाहिले आहे. यादरम्यान संघाने 5 वेळा प्लेऑफ गाठले, तर 2016 मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर संघाचा कर्णधार होता. यानंतर, 2020 च्या हंगामात, टॉम मूडी यांना फ्रँचायझीने क्रिकेटचे संचालक बनवले आणि ट्रेवर बेलिस यांना प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली. 2020 हा हंगाम निराशाजनक ठरला. त्यामुळे मूडी यांना पुन्हा प्रशिक्षकपद देण्यात आले.

टॉम मूडी आणि सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी या दोघांनीही कराराचा पाठपुरावा न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे एक कारण म्हणजे टॉम मूडी यांना अरब अमिराती (UAE) च्या 'ILT20' लीगमधील डेझर्ट वायपर्स संघाचे क्रिकेट संचालक बनवण्यात आले आहे. ही लीग 2023 पासून सुरू होणार आहे.

टॉम मूडीची 'निराशाजनक' दुसरी टर्म

टॉम मूडी आपल्या कोचिंगच्या भूमिकेत परतले तेव्हा त्यांचा कार्यकाळ खूपच खराब होता. सनरायझर्स हैदराबाद संघाने दोन हंगामात 28 सामने खेळले, त्यापैकी केवळ 9 सामन्यात त्यांना विजयी होता आले. जिंकले. एक सामना बरोबरीत राहिला, तर सनरायझर्स संघाला 18 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने 14 पैकी केवळ 6 सामने जिंकून आठव्या क्रमांकावर स्थान मिळविले. संघाचा कर्णधार केन विल्यमसनही खराब फॉर्मशी झुंजताना दिसला होता.

SCROLL FOR NEXT