

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील जिरायती भागात सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहत असून, शेतात तसेच घरात पाणी शिरल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
जिरायती भागातील शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल या परिसरात सर्वांधिक पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या शेतातील बांध वाहून गेलेत, तर उभ्या पिकात पाणी शिरले आहे. काही शेतकर्यांची पिके भुईसपाट झाली असून, गाडीखेल तसेच साबळेवाडी परिसरात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या शेतकर्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
जवळपास 300 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले असून, शासनाने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. या ठिकाणी अनेक लोकांची शेती वाहून गेली आहे. पंचनामे करून लोकांना भरपाई द्यावी.
– गणेश शिंदे, सरपंच, साबळेवाडीगाडीखेल गावात 102 मिलिमीटर एवढ्या उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. पिकांसह शेतीमधील माती या ठिकाणी वाहून गेली आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
– बाळासाहेब आटोळे, सरपंच, गाडीखेलगाडीखेल साबळेवाडी येथील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले आहेत. लोकांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळेल.
– अरुण त्रिभवन, तलाठी, गाडीखेल