केज-बीड रोडवर मोटरसायकलला पिकअपची धडक; दोघे गंभीर जखमी

अपघात
अपघात

केज; पुढारी वृत्‍तसेवा : केज-बीड रस्त्यावर मोटरसायकल आणि पिकअप व्हॅनचा अपघात झाला. यामध्ये एका मोटरसायकलीला भरधाव वेगातील पिकअपने जोराची धडक दिली. त्यात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज (शनिवार) सकाळी ११:०० वाजता केज-बीड महामार्गावर मोटरसायकल आणि पिकअपमध्ये अपघात झाला. डोनगाव फाटा, पद्मश्री विठ्ठलराव पाटील साखर कारखान्याजवळील अर्णव स्नॅक्स सेंटर जवळ मोटरसायकल क्रं. (एम एच ४४/आर ९१२४) ला केज कडून बीडच्या दिशेने जात असलेल्या पिकअप क्रं (एम एच २४/ए यू ५६७०) या भरधाव वाहनाने जोराची धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले.

रुग्णवाहिकेतून जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने सरकारी वाहनाने पोलिस उपनिरीक्षक कादरी, त्रिंबक सोपने, शेख पाशा आणि दिलीप गित्ते व गृहरक्षक दलाचे जवान शिवदास आवाड यांनी अपघातस्थळी हजर होत कारवाई केली.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news