आयकर खात्याकडून १.१४ लाख कोटी रुपयांचा परतावा | पुढारी

आयकर खात्याकडून १.१४ लाख कोटी रुपयांचा परतावा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत आयकर खात्याकडून 1.14 लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. वैयक्तिक आयकराच्या 1 कोटी 96 लाख 998 प्रकरणांमध्ये 61 हजार 252 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

कंपनी कराच्या 1 लाख 46 हजार 871 प्रकरणांमध्ये 53 हजार 158 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होते. तेव्हापासून सरत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत वरील परतावा करदात्यांना देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button