पुणे : राज्यातील पाऊस पूर्णपणे थांबला असून, आता शुष्क अन् कोरडे हवामान तयार झाल्याने कमाल तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारी (दि.3) सलग दुसऱ्या दिवशी यवतमाळचा पारा देशात सर्वोच्च 39.5 अंशांवर गेला होता. तर महाबळेश्वर सर्वात थंड असून, तेथील किमान तापमान 14 अंशांवर आहे.
गेले तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात बाष्पयुक्त ढग आल्याने ऊन व पाऊस असा प्रकार सुरू होता. ढगाळ वातावरण अन् गार वार्याने राज्यात गेले तीन दिवस आल्हाददायक वातावरण तयार होऊन पारा 34 ते 35 अंशांवर खाली आला होता. मात्र, रविवारपासून ढगांची गर्दी कमी झाल्याने पारा पुन्हा चाळीशीकडे जात आहे. त्यामुळे पुन्हा उन्हाचा चटका जाणवायला सुरुवात होईल.
हेही वाचा