पुणे : अफगाणिस्तानात तयार झालेल्या पश्चिमी चक्रवाताचा परिणाम उत्तर भारतावर झाला असून त्या भागात जोरदार बर्फवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 23 फेब्रुवारीदरम्यान काश्मीरला थंडीचा रेड तर पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागांना यलो अलर्ट दिला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर फार होणार नाही.
मात्र किमान तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पावसाची कमी शक्यता आहे. पहाटे व रात्रीच्या तापमानात तीन दिवस किंचित घट दिसेल. कमाल तापमानात फारसा फरक दिसणार नाही, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
हेही वाचा