पनवेल, पुढारी वृत्तसेवा : खांदेश्वर पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त करून ठेवलेल्या गाड्यांना आज (दि.१९) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास आग लागली. यात दोन गाड्या जळून खाक झाल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले. सिडको आणि पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या आगीत खासगी बस आणि डंपर जळाले.
खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांनी काही वाहने जप्त केली आहेत. ही वाहने खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर 8 खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या समोरील मोकळ्या भूखंडावर ठेवण्यात आली आहेत. या मोकळ्या मैदानात जवळपास १० ते १५ वाहने उभी आहेत. या वाहनांची दुरवस्था झाली आहे. यापैकी बस आणि डंपरला आग लागली. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविले, अन्यथा आजूबाजूच्या इतर गाड्यांना आग लागली असती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा