Latest

Meghalaya Elections 2023 : मेघालय विधानसभा निवडणूक; उद्या मतदान, भाजप की एनपीपी?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: मेघालयातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सोमवारी (दि.२७) मतदान होत आहे. विधानसभेच्या ६० जागांसाठी या निवडणूका होत आहेत. मेघालय विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ हा १५ मार्च रोजी संपणार आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ३१ असणार आहे.

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीसाठी २१ लाखांहून अधिक मतदार सोमवारी(दि.२७) ३६९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. राज्यातील ६० विधानसभा मतदारसंघांसाठी ३४९१ मतदान केद्रांवर मतदान होणार आहे. सोमवारी (दि.२७) सकाळी ७ वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे.

Meghalaya Elections 2023: पुन्हा सत्तेत येण्यास सत्ताधारी पक्षाला मोठे आव्हान

सत्तेत पुन्हा परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीपी) यावेळी सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागू शकतो. दुर्गम आणि डोंगराळ भागात पायाभूत सुविधांचा अभाव हा यावेळच्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा आहे. याशिवाय भ्रष्टाचाराचे आरोपही एनपीपी सरकारसाठी मोठी समस्या बनले आहेत. याशिवाय जैंतिया आणि खासी हिल्समधील बेकायदेशीर कोळसा खाणीचा प्रश्नही निवडणुकीवर परिणाम करू शकतो.

Meghalaya Elections 2023: भाजपचा मोठा दावा

मेघालय भाजपचे प्रमुख अर्नेस्ट मॉरी यांनी सांगितले की, मेघालय हे ख्रिश्चन बहुसंख्य राज्य आहे आणि भाजप सत्तेत आल्यास ख्रिश्चनांना अधिक संरक्षण देईल. जर भाजप राज्यात सत्तेवर आला तर ते गोमांस खाणाऱ्या लोकांवर कोणतीही बंदी घालणार नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT