Latest

Todd Murphy : शिकारी मर्फीपुढे विराटची हाराकिरी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी सामने होणार आहेत. यापैकी पहिल्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत आघाडीवर आहे. तर, ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात आघाडीवर आहे. इंदूर येथे आजपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना भारतीय संघ पहिल्या डावात चांगली कामगिरी करू शकला नाही. सामन्यात फलंदाजी करताना टॉड मर्फीने पुन्हा एकदा विराट कोहलीला बाद केले. त्याने आपल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तीन वेळा विराटला बाद केले. (Todd Murphy)

इंदूर येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या तिखट माऱ्याने भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. यामुळे संघातील प्रमुख फलंदाज स्वस्तात पाठोपाठ बाद झाले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने काहीकाळ संघर्ष केला. मात्र, पहिला सत्राच्या अखेरीस त्याला ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने पायचित बाद केले. यावेळी विराटने ५२ चेडूत सर्वाधिक २२ धावा केल्या. (Todd Murphy)

या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातून मर्फीने कसोटीमध्ये पदार्पण केले आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात सात विकेट घेत त्याने अफलातून कामगिरी बजावली होती. यामध्ये त्याने विराट कोहलीलादेखील बाद केले होते. यानंतर झालेल्या दिल्ली येथील कसोटी सामन्यात ही मर्फीने आपल्या फिरकीने विराटला बाद केले होते.

मालिकेत आत्तापर्यत विराट विरूध्द मर्फी असे चित्र पाहायला मिळाले आहे. आत्तपर्यत मर्फीने विराटने मर्फीच्या ८३ चेंडूचा सामना केला आहे. त्यामध्ये विराटने ३९ धावा केल्या आहेत. तर मर्फीने विराटला तीन वेळा बाद केले आहे. यादरम्यान मर्फीचा सरासरी १३ इतकी आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT