Latest

Virat Kohli and Rohit Sharma : रोहित शर्माचे वाजले बारा, विराट कोहली करू लागला डान्स!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली. मालिकेतील तिसऱ्या सामन्याला आज (बुधवारी दि.१) सुरूवात झाली. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय चुकीचा ठरला असल्याचे बोलले जात आहे. कारण पहिल्या डावात भारताला सर्वबाद १०९ धावाच करता आल्या आहेत. याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने आजच्या दिवस अखेर ४ विकेट गमावत १५६ धावा केल्या आहेत. (Virat Kohli and Rohit Sharma)

सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांनी चांगली सुरूवात करत कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी वाढवली आहे. ऑस्ट्रेलियाने ट्रायव्हस हेडच्या रुपाने पहिली विकेट गमावली होती. मात्र, यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन यांनी ९६ धावांची भागिदारी केली. या वेळी रोहित शर्माच्या तोंडावर अक्षरश: १२ वाजलेले पहायला मिळाले. मात्र, यावेळी भारताचा फलंदाज विराट कोहली मात्र, डान्स करताना पहायला मिळाला. त्याचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. (Virat Kohli and Rohit Sharma)

यापूर्वीही अनेकदा रोहित शर्मा डान्स करत व्यायाम करत असलेला पहायला मिळाला होता. मात्र, यावेळी त्याचा डान्स करताना आणि रोहित शर्माच्या तोंडावर १२ वाजलेला व्हिडिओ एकाच वेळी कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने इंदूरमध्ये भारतावर पलटवार केला. टॉस जिंकून पहिला फलंदाजी करणा-या यजमान भारतीय संघाला कांगारूंनी 109 धावातच गारद केले. त्यानंतर प्रत्युत्तरात चार विकेट गमावून 156 धावा केल्या आणि भारतावर 47 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. रवींद्र जडेजाने चार विकेट घेत भारताच्या काहीशा आशा उंचावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 60 तर मार्नस लॅबुशेनने 31 धावा केल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ 26 धावा करून बाद झाला. (Virat Kohli and Rohit Sharma)

तत्पूर्वी, नागपूर आणि दिल्लीच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला नाचवणारी टीम इंडिया इंदूर कसोटीत मात्र आपल्याच चक्रव्यूहात अडकली आणि तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित सेनेचे दहा शिलेदार अवघ्या 32.2 षटकात 109 धावांतच गारद झाले. होळकर स्टेडियमवर पहिल्याच दिवशी कांगारूंच्या फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी करून यजमान संघाच्या एकाही फलंदाजा क्रिजवर टीकू दिले नाही. भारताचे दिग्गज फलंदाज मैदानात कधी आले आणि कधी निघून गेले हे कळलेच नाही. मॅथ्यू कुहनेमनने 5 आणि नॅथन लियॉनने 3 विकेट्स घेतल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. (Virat Kohli and Rohit Sharma)

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT