Latest

Virat Kohli Record | विराटचा आणखी एक विक्रम! ठरला क्रिकेटच्या १४६ वर्षांच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. परंतु या सामन्यात भारताचा फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कधीही न झालेला विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Virat Kohli Record)

क्रिकेटची सुरूवात 1877 साली झाली. तेव्हापासून विराट असा पहिला खेळाडू आहे ज्याने सात वेगवेगळ्या कॅलेंडर वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 2000 हून अधिक धावा केल्या आहेत. विराटने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सात वेळा 2000+ धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. द. आफ्रिकाविरूद्धच्या दुसऱ्या डावात विराटने 82 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 76 धावा करत 2000 धावांचा टप्पा गाठला. (Virat Kohli Record)

2023 मध्ये विराटने 35 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 36 डावांमध्ये 66.06 च्या सरासरीने 2048 धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वी त्याने 2012 मध्ये 2186 धावा, 2014 मध्ये 2286 धावा, 2016 मध्ये 2595 धावा, 2017 मध्ये 2818 धावा, 2018 मध्ये 2735 धावा आणि 2019 मध्ये 2455 धावा केल्या होत्या. 1877 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यापासून (अधिकृत रेकॉर्डनुसार) इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही. कोहलीनंतर श्रीलंकेचेा दिग्गज खेळाडू कुमार संगकाराने सहा कॅलेंडर वर्षांमध्ये 2000 धावा केल्या आहेत.

संगकाराने 2013 (2868 धावा), 2006 (2609 धावा), 2009 (2436 धावा), 2011 (2267 धावा), 2012 (2148 धावा) आणि 2004 (2124 धावा) अशी कामगिरी केली होती. तर श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी पाच वेळा अशी कामगिरी केली आहे. जयवर्धनेने 2001 (2313 धावा), 2007 (2230 धावा), 2006 (2179 धावा), 2009 (2094 धावा) आणि 2013 (2007 धावा) अशी कामगिरी केली होती. तर, सचिनने 1998 मध्ये 2541 धावा, 1996 मध्ये 2234 धावा, 2007 मध्ये 2201 धावा, 2002 मध्ये 2133 धावा आणि 1997 मध्ये 2011 धावा केल्या होत्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT