Latest

Lok Sabha Election : कंगना विरुद्ध काँग्रेसचा उमेदवार ठरला! प्रतिभा सिंहांची माहिती

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  बॉलीवूड अभिनेत्री कंनगा रानौत या हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्‍यांच्‍याविरोधात काँग्रेसचे हिमाचल प्रदेशमधील मंत्री विक्रमादित्य सिंह निवडणूक लढवतील, अशी माहिती मंडीच्या काँग्रेसच्‍या विद्यमान खासदार प्रतिभा सिंह आणि विक्रमादित्‍य यांच्‍या आई प्रतिभा सिंह यांनी दिली आहे. पक्षाकडून अद्याप विक्रमादित्य यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, भाजपने कंगना राणौत rh'dh मंडीतून उमेदवार घोषित केले आहे. त्‍या काय करतात किंवा काय बोलतात यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. मंडईतील जनता सदैव आमच्यासोबत आहे, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे.

मला कोणीही धमकावू शकत नाही. हा मतदारसंघ काहींना आपल्‍या पूर्वजांची इस्टेट वाटते, अशा शब्‍दांमध्‍ये कंनगा राणौत यांनी टीका केली होती. प्रतिभा सिंह म्‍हणाल्‍या की, कंगना राणौत यांनी विक्रमादित्य विरोधात केलेल्या टीकेची मला पर्वा नाही. यापूर्वी कठीण परिस्थितीतही मी जागा जिंकली आहे.

कंनगा यांनी गोमांस खाल्ल्याबद्दलच्या वृत्तांबद्दल बोलताना विक्रमादित्‍य सिंह म्‍हणाले होते की, "मी प्रभू रामाला प्रार्थना करतो त्‍यांना बुद्धी द्यावी. 'देवभूमी' हिमाचलमधून बॉलीवूडमध्ये परत जाईल. कारण ती निवडणूक जिंकणार नाही कारण तिला हिमाचलच्या लोकांबद्दल काहीच माहिती नाही. त्‍यांनी हिमाचल प्रदेश आणि मंडीतील प्रश्नांवर बोलावे. मान्सूनच्या सर्वात भीषण आपत्तीत कंगना यांनी एका दिवसासाठीही मनालीला भेट दिली होती का, असा सवालही त्‍यांनी केला होता.

 कोण आहेत विक्रमादित्‍य सिंह?

विक्रमादित्य हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत.  त्‍यांचा जन्‍म १७ जन्म १७ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. २०१६ साली सेंट स्टीफन कॉलेज दिल्ली येथून मास्टर्स ऑफ आर्ट्स (इतिहास) मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी हंस राज कॉलेज दिल्ली विद्यापीठातून २०११ मध्ये बीए (ऑनर्स) केले आहे. व्यवसायाने, ते एक कृषीतज्ज्ञ, बागायतदार आणि व्यापारी आहेत.

हिमाचल प्रदेशात ते दोनदा आमदार झाले. 2022 मध्ये विक्रमादित्य सिंह यांनी भारतीय जनता पक्षाच्या रवी मेहता यांचा 13860 मतांच्या फरकाने पराभव करून सिमला ग्रामीण विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.याव्यतिरिक्त, त्यांनी 2013 ते 2018 पर्यंत हिमाचल प्रदेश राज्य युवक काँग्रेसचे प्रमुख म्हणून काम केले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT