Latest

vicky-kat Marriage Update : विकी-कॅटच्या लग्नाबाबत प्रा. उपाध्याय यांची भविष्यवाणी…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क 

सगळीकडे चर्चा आहे ती, अभिनेता विकी कौशल आणि बाॅलीवूडची आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ  यांच्‍या लग्‍नाची!  बाॅलीवूडमधील नट-नट्यांची लग्‍न हाेतात; पण टिकतात कुठे?, अशीही चर्चा यानिमित्त रंगत आहेत. तर आजपर्यंत झालेल्‍या बाॅलीवूडमधील प्रसिद्‍ध कलाकरांच्‍या लग्‍नाला उजाळाही मिळाला आहे. आता  (vicky-kat Marriage Update) विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्‍या  विवाहाबाबत बनारसचे प्रसिध्द ज्योतषी आणि काशी हिंदू विश्वविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रमौली उपाध्याय यांनी भविष्यवाणी केली आहे.

विक्की-कॅटच्या बाबतीत भविष्यवाणी.

नुकतेच अभिनेता राजकुमार राव आणि त्याची प्रेयसी पत्रलेखा विवाहबंधनात अडकले, पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री अंकिता लोखंडे प्रियकर विकी जैनशी लग्न करत आहे. अभिनेत्री अलिया भट्ट आणि रणबीर कपूर हेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्‍याची चर्चा आहे. येत्या ९ डिसेंबरला अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना (vicky-kat Marriage Update) कैफ विवाहबंधनात अडकणार आहेत.

vicky-kat Marriage Updateविकी-कॅटच्या लग्नाचाच बोलबोला

सध्या विकी-कॅटच्या लग्नाचाच बोलबोला ऐकायला मिळत आहे. या दाेघांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्‍हा अनेकांना धक्का बसला होता. ही अफवा असवा किंवा एखाद्‍या चित्रपटाचे प्रमोशन, असेच अनेकांना वाटलं होते. तेव्हापासून विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाबाबातीत चर्चेला उधाण आले हाेते.  लग्न कुठे असेल, याचे आमंत्रण कोणाला असेल? टरिनाचे अफेअर ते विकी कौशलचा सिनेसृष्टीतील प्रवास यबाबत चर्चा सूरू झाली.  सोशल मीडियावर कॅटरिना, अभिनेता सलमान खान, रणबीर कपूर यांच्यावरील मिम्सचा धूमाकूळ घातला आहे.

Katrina Kaif -Vicky Kausha

मैत्री आणि प्रेमही वाढत जाईल…

नुकतचं विकी-कॅटच्या लग्नाबाबत बनारसचे प्रसिध्द ज्योतषी आणि काशी हिंदू विश्वविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रमौली उपाध्याय भविष्यवाणी केली आहे. विकीची वृषभ आणि कॅटरिनाची मिथून रास या नात्याला मजबूती देईल. दोघांच्यात मैत्री आणि प्रेमही वाढत जाईल.  दाेघांमधील नातं अधिक दृढ हाेईल, असेही  त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचलं का?  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT