Latest

उत्तराखंड : लाहोघाट मतदारसंघात काॅंग्रेसचे खुशाल सिंह अधिकारी विजयी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येणे सुरू झाले आहे. उत्तराखंडचा पहिला निकाल काॅंग्रेस पदरात पडलेला आहे. कारण, लोहाघाट मतदार संघातून काॅंग्रेसचे खुशाल सिंह अधिकारी यांनी बाजी मारलेली आहे. १६ टप्प्यात मतमोजणी केल्यानंतर काॅंग्रेसला हा विजय मिळाला आहे. खुशाल सिंह अधिकारी यांनी भाजपाचे उमेदवार पूरन सिंह यांचा पराभव केला आहे.

काॅंग्रेसचे उमेदवार खुशाल सिंह अधिकारी यांना एकूण ११, ९०९ मते मिळाली आहे. तर भाजपाचे उमेदवार पूरन सिंह यांना एकूण ८६५१ मते मिळाली आहेत. अधिकारी यांनी एकूण मतांपैकी ५३.४३ टक्के मते मिळाली आहेत, तर पूरन सिंह यांना ३८ टक्के मतांवरच समाधान मानावं लागलं आहे. उत्तरखंडच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काॅंग्रेस आणि भाजपा यांच्या टक्कर पाहायला मिळत आहे.

या निवडणुकांचा पहिला निकाल काॅंग्रेसच्या वाट्याला आला आहे, त्यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांमुळे आनंदाचे वातावरण आहे. पक्षाकडून असा दावा केला जात आहे की, उत्तराखंडमध्ये काॅंग्रेसचेच सरकार स्थापन केले जाईल. विशेष हे की, या मतदारसंघात आम आदमी पक्षाकडून राजेश सिंह बिस्ट हे मैदानात उतरले होते. त्यांना फक्त ४१४ मते पडली आहेत.

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT