उत्तराखंड : हरिद्वार मतदारसंघात भाजपाचे मदन कौशिक इतिहास रचणार? | पुढारी

उत्तराखंड : हरिद्वार मतदारसंघात भाजपाचे मदन कौशिक इतिहास रचणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाचं नशीब चमकणार हे काही वेळातच कळणार आहे. उत्तराखंडमध्ये मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. राज्यातील सत्तेवर काॅंग्रेस की, भाजपा असणार, याकडे राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलेले आहे. विशेषतः हरिद्वार विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक मैदानात उतरले आहेत. या मतदार संघात भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. कारण, कौशिक हे सलग ४ वेळा येथून निवडणून आलेले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपा आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

यापूर्वी हरिद्वार मतदारसंघात भाजपा आणि काॅंग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली होती. २०१२ मध्ये विधानसभा निवडणुकीत मदन कौशिक आणि सतपाल ब्रह्मचारी यांच्या कांटे की टक्कर झालेली होती. मात्र, यावेळी ही लढत कित्येक पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हरिद्वार मतदारसंघातील जनतेच्या नजरा कोण निवडून येणार, याकडे लागलेल्या आहेत.

हरिद्वार मतदारसंघात मदन कौशिक हे नेहमीच बाजी मारत आले आहेत. कौशिक हे २००७ मेजर जनरल (निवृत्त) बीसी खंडुडी आणि त्यांनंतर डाॅ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्री होते. २०१७ मध्ये त्रिवेंद्री रावत हेदेखील कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. आज ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. यावेळी त्यांची टक्कर हे काॅंग्रेसच्या सतपाल ब्रह्मचारी यांच्याशी होत आहे.

यंदा उत्तराखंडमध्ये ५९.७६ टक्के मतदान

२०२२ विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मतदारांची संख्या १ लाख ४९ हजार १०८ आहेत. ज्यात ५९.७६ टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे. २०१७ च्या तुलनेत यंदा झालेले मतदान कमी झालेले आहे. २०१७ मध्ये ६५.१८ टक्के मतदान झालेले होते. हरिद्वार जागेवर मदन कौशिक, सतपाल ब्रह्मचारी आणि यांच्याशिवाय ७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत.

हे वाचलंत का? 

Back to top button