Latest

Urfi Javed : आधी ब्रा दाखवली नंतर बटण केलं उघडं आणि आता…!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : उर्फी जावेद (Urfi Javed) बिग बॉस ओटीटीच्या सीझनमुळे चर्चेत आली. पण, फार काळ ती बिग बॉसच्या घरात टिकू शकली नाही. सुरुवातीला तिला लवकरचं बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता उर्फी जावेद हिची पुन्हा एकदा चर्चा होतेय. यंदाचा तिचा लुक खूप वेगळा आहे. एकीकडे तिने हिजाब घातला आहे. दुसरीकडे उर्फीने पूर्णपणे बॅकलेस ड्रेस घातला आहे. पण, तिचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला नाही. त्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये उर्फी (Urfi Javed) दिसत आहे. तिचा बॅकलेस टॉप हॉट दिसत असला तरी हिजाबवरून तिला ट्रोल केले जात आहे. कॅमेरासमोर ती ड्रेस फ्लॉन्ट करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मागीलवेळी जिप आणि पँटचे बटण उघडून तिने धमाका केला होता.

बॅकलेस टॉप आणि हिजाब घातल्याने काहींच्या धार्मिक भावना दुखावले आहेत. काही यूजर्सनी तिला ट्रोलदेखील केलं आहे. फोटोवर एकाने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलंय-तिला कोणीतरी चांगला टेलर द्या. तर दुसऱ्याने तिला धर्माचे धडे दिले. तू हिजाब घालून अंगप्रदर्शन कशी काय करू शकतेस? तर तिला थोडी तर लाज बाळग, अशीही कमेंट दिलीय.

पँटचे बटण उघडे ठेवल्याने गरम चर्चा

दरम्यान, उर्फीला पॅपराजीने एअरपोर्टवर स्पॉट केलं होतं. नेहमीप्रमाणे उर्फी वेगळ्या अंदाजात दिसत होती. त्यावेळी तिने क्रॉप टॉपसोबत चेक्स पँट घातली होती. तिने पँटचं बटण उघडं ठेवलं होतं. त्यामुळे सोशल मीडियावर ती हॉट टॉपिक झाली होती.

पाहा व्हिडिओ – 'बेगम' अनुजाला सासर आवडतं की माहेर | Rapid Fire with Anuja Sathe | Ek Thi Begum | Mx Player

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT