Latest

लादेन याचा फोटो कार्यालयात लावणारा अधिकारी निलंबित

स्वालिया न. शिकलगार

लखनऊ : पुढारी ऑनलाईन डेस्क

दहशतवादी ओसामा बीन लादेन याचा फोटो कार्यालयात लावणार्‍या उत्तर प्रदेशमधील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.  रवींद्र प्रकाश गौतम असे त्‍याचे नाव आहे. ताे दक्षिणांचल येथे उपविभागीय अधिकारी म्‍हणून कार्यरत होता.

जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता, असे फोटो ओळ देऊन गौतम याने लादेनचा फोटो आपल्‍या कार्यालयात लावला होता.
तसेचआदरणीय ओसामा बीन लादेन असाही उल्लेख या फोटोवर करण्यात आला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने दखल घेत गौतम यांना निलंबित केले आणि हा फोटो कार्यलयातून हटवला.

फारुकाबाद जिल्ह्याचे दंडाधिकारी संजय कुमार सिंग यांनी ही कारवाई केली.  गौतम याने स्वतःच्या कृतीचे समर्थन केले आहे. कुणी कुणाला आदर्श मानावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लादेन जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता होता, असे माझे मत आहे. माझ्याकडे त्याचे अनेक फोटो आहेत, असे त्‍याने म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT