Latest

Weather Forecast | अवकाळीचे सावट! पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : चक्रीय वार्‍याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रात देखील अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, आज (दि. ७) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला आज ऑरेंज अलर्ट (Weather Forecast  देण्यात आला असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Weather Forecast : ८, ९ एप्रिलला देखील राज्यात पाऊस

राज्यात उत्तर कोकण, मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड वगळता उर्वरित राज्यात ८ एप्रिलला अवकाळी पाऊस पडणार आहे. तर ९ एप्रिलला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही प्रमाणात अवकाळीचा इशारा (Weather Forecast) हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

अवकाळीची स्थिती का निर्माण झाली?

बांगलादेशच्या ईशान्य भागात आणि राजस्थानच्या नैऋत्येकडील भागात चक्रीय वादळी वार्‍याची स्थिती सक्रिय झाली आहे. त्यामुळे मध्य छत्तीसगडच्या प्रदेशातून दक्षिण तमिळनाडूकडे सातत्याने वारे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.  चक्रीय वार्‍याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील पूर्व, ईशान्य, पश्चिम आणि दक्षिण भारतासह राज्यांमधील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस (Weather Forecast) पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT