नाशिक : चांदवडला अवकाळी पावसाची हजेरी | पुढारी

नाशिक : चांदवडला अवकाळी पावसाची हजेरी

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : गुरुवारी (दि.६) चांदवड शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चांदवड, वडबारे, नांदूर टेक, राजदेरवाडी, राहुड गावात हलक्या स्वरूपाच्या पाऊसाच्या सरी आल्या. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला उन्हाळ कांदा, गहू, टरबूज, कांदा बियाणे पिकांचे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावरील कांदे गहू झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गर्मी पासून नागरिकांची थोड्या वेळ का होईना दिलासा मिळाला.

Back to top button