राहाता(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : एक वेगळा पायडा निर्माण करत स्मशानभुमीत विवाह सोहळा केला. त्या सोहळ्याचे आम्हाला कन्यादान करुन संसार उपयोगी भांडी भेट देत या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होता आले याचा आम्हाला मनस्वी आनंद होत असून हे आमचे भाग्य असल्यांचे मत प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी व्यक्त केले.
राहाता शहरात स्मशानभुमीत एक अनोखा आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न झाला. राहाता येथील स्मशानभुमीत राहणारे गायकवाड कुटुंबाने मुलीचा शुभविवाह स्मशानभुमीतच मोठ्या थाटामाटात संपन्न केला. राहाता शहराच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉ. राजेंद्र पिपाडा हे त्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, किरण बावळे, कुणाल काळे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पिपाडा म्हणाले, आजच्या या अधुनिक युगात स्मशानभुमीत राहुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कऱणे मोठे जिकरीचे असते. त्यातच राहाता येथील स्मशानभुमीत राहणार्या एका कुटुंबाने स्मशानभुमीतच आपल्या मुलीचा विवाह सोहळा पार पाडला. शुभविवाहात नुतनीकऱण झालेल्या देखण्या स्मशानभुमीने चार चांद लगावले, यात काही शंकाच नाही.
हेही वाचा