Latest

Udayanraje Bhosale : वादग्रस्त विधाने ही विकृतीच : खा. उदयनराजे भोसले 

सोनाली जाधव
पुढारी ऑनलाईन डेस्क : "छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपालांनी केलेल्‍या वादग्रस्‍त विधानांना आधार काय ? असा सवाल करत वादग्रस्‍त विधाने ही एक विकृतीच आहे. मी अशा विकृतीचा तीव्र निषेध करतो, अशा शब्‍दांमध्‍ये खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते सुधांशू त्रिवेदी
( Sudhanshu Trivedi ) यांच्यावर निशाणा साधला.

Udayanraje Bhosale:शिवाजी महाराजांनी आधुनिक भारताची संकल्‍पना मांडली 

पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना सन्मान मिळवून दिला. अन्याय दूर करत त्‍यांनी लोकांना गुलामिरीतून बाहेर काढले. जगभरातील अन्‍य राज्‍यांनी आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी लढाई केल्या; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी  लोकांना गुलामगिरीतुन बाहेर काढण्यासाठी लढाई केल्या. आधुनिक भारत ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडली.छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भगतसिंह, क्रांतिसिंह नाना पाटील, डॉ. बाबासाहेब  आंबेडकर, सुभाषचंद्र बोस या सर्वांच स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज होते."

बुद्धी भ्रष्ट झाली की काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदद्ल वादग्रस्‍त वक्तव्य करणार्‍यांची बुद्धी भ्रष्ट झाली की आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदद्ल बोलतात तेव्हा त्यांना लाज वाटत नाही काय? काय बोलतात? ते कसला आधार घेवून ते बोलतात?  सर्वधर्म समभाव, स्वराज्याची संकल्पना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला.  तो विचार घेवून त्यांनी कार्य केले.  प्रत्येक जातीचा, धर्मस्थळांचा, लोकांचा, स्त्रियांचा विचार केला. इतिहास जवळून पाहाल तेव्हा समजेल त्यांचा विचार काय होता. आज या विधानावर दु:ख होण्यापेक्षा प्रचंड चीड येते, असेही उदयनराजे म्‍हणाले.
आज देशभरात वेगवेगळ्या विभिन्न जातीतील लोक राहतात. जर त्यांना एकत्र ठेवायचे असेल तर सर्वधर्म समभाव मांडलेला विचार घेवून राहायला हव. नाहीतर या देशाची तुकडे व्हायला किती  वेळ लागणार नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात  समाजाचा विचार करत, लोकांसाठी काय करायला हवं याचा विचार करत. त्यांनी  फक्त घरातील लोकांनाच कुटूंब  मानल नाही तर देशातील सर्वांना कुटुंब मानलं, असेही ते म्‍हणाले.

लोकशाहीची संकल्पना छ. शिवाजी महाराजांची

आपला भारत देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश. लोकशाहीची संकल्पना छ. शिवाजी महाराजांची होती. हा विचार त्यावेळी त्यांनी मांडला. इतरांची साम्राज्य ही त्यांच्या त्यांच्या नावाने ओळखायची पण छ. शिवाजी महाराजांच  राज्य़ हे जनतेच राज्य़ म्हणून ओळखले जायचं. त्यांच्या काळात "मी" हा विचार म्हणजे व्यक्ती हा नसायचा तर "समाज" असायचा. आज "मी" म्हणजे वैयक्तिक विचार आहे.  थोरांचे विचार नाव आणि पुतळे करायलाच पाहिजे. मात्र त्यांचे विचार ते आचरणात आणणार आहे की नाही? असाही सवालही त्‍यांनी केला.

Udayanraje Bhosale : आपण विसरतोय… 

छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची  संकल्पना मांडली, आजची लोकशाही आहे तोही विचार त्यांनी त्यांच्या काळात मांडला. तुम्ही-आम्ही आज फिरतोय,  मोकळा श्वास घेतोय ते छ. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांमुळे. नाहीतर आपण गुलमरीत राहीलो असतो. हे आपण विसरतोय, असेही ते म्‍हणाले.

Udayanraje Bhosale : विकृती ही विकृती असते

सिनेमातून लिखाणातून विद्रुपीकरण केलं जात तेव्हा शिवाजी महाराजांच्यावरील प्रेम कुठे जाते? असाही प्रश्न त्यांनी केला. शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं जात तेव्हा का गप्प बसता? राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मंचावर विधान केलं त्या मंचावर जेष्ठ  नितीन गडकरी, शरद पवार होते. ते का बोलले नाहीत.  महापुरुषांवर वादग्रस्त विधान करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. त्रिवेदीची हकालपट्टी करावी. वादग्रस्त विधानांची विकृती ही विकृती असते. असेही उदयनराजे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT