Latest

प्रो-कबड्डी : यू-मुम्बाची विजयी सलामी

अनुराधा कोरवी

बंगळूर : वृत्तसंस्था अभिषेक सिंगच्या शानदार कामगिरीच्या बळावर यू-मुम्बाने बंगळुरू बुल्सवर 46-30 गुणांनी एकतर्फी विजय मिळवत प्रो-कबड्डी लीगच्या आठव्या सत्रात विजयी सलामी दिली. तर तेलुगु टायटन्स आणि तमिळ थलैवाज यांच्यातील दुसरा सामना 40-40 असा टाय झाला.

यू-मुम्बाच्या अभिषेक सिंगने सुपर टेन लावताना 19 गुण मिळविले. त्याच्या व्यतिरिक्त यू-मुम्बाच्या व्ही. अजित (6 गुण) यानेही शानदार कामगिरी केली. तर, बंगळूर बुल्सच्या पवन सेहरावत (12) आणि चंद्रन (13) यांचा अपवाद वगळता अन्य खेळाडू चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. पहिल्या हाफनंतर यू-मुम्बा 24-17 अशी आघाडी मिळविली होती.

यू-मुम्बाने जबरदस्त खेळ करत पहिल्या आठव्या मिनिटालाच बंगळुरूला सर्वबाद केले. त्यानंतर चंद्रन रंजित व पवन सेहरावत यांनी चांगला खेळ केल्याने यू-मुम्बावर एकवेळ सर्वबाद होण्याचे संकट अभिषेकने टाळले. दुसर्‍या हाफमध्येही यू-मुम्बाने बंगळुरूला सर्वबाद केले. मुम्बाने सामना 46-30 असा जिंकला.

दरम्यान, दुसरा सामना तेलगु टायटन्स आणि तमिळ थलैवाज यांच्यात झाला. श्वास रोखून धरावयास लावलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. शेवटी हा सामना 40-40 असा टाय झाला. तर, अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या तिसर्‍या सामन्यात बंगाल वॉरियर्सने युपी योद्धावर 38-33 अशा गुणांनी विजयी सलामी दिली.

आजचे सामने

गुजरात जायंटस् वि. पिंक पँथर्स : (सध्या. ७.३० वा.)
दबंग दिल्ली वि. पुणेरी पलटण : (सध्या. ८.३० वा.)
हरियाणा स्टीलर्स वि. पाटणा पायरेटस् ( रात्री ९.३० वा.)

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT