पुढारी ऑनलाईन: सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या दोन वर्षीय चिमुरड्याच्या उपचारासाठी 16 कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. मिळालेल्या या देणगीतून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. भारतीय वंशाच्या दोन वर्षीय मुलाला दुर्मिळ अशा 'न्यूरोमस्कुलर' आजाराने ग्रासले होते. सिंगापूरमधील लोकांकडून मिळालेल्या सुमारे 16 कोटींच्या देणगीच्या रकमेतून त्याच्यावर उपचार करण्यात आले. आता उपचारानंतर तो चालू शकणार आहे. अत्यंत दुर्मिळ मज्जासंस्थेच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलाचे नाव देवदान देवराज. न्यूरोमस्क्युलर रोगावर उपचार करणे खूप महाग आहे, परंतु लोकांच्या मदतीनंतर या मुलावर उपचार करणे शक्य झाले.
न्यूरोमस्क्युलरचा त्रास असलेला देवदान देवराज हा भारतीय वंशाचे डेव देवराज आणि चिनी वंशाची इंटिरिअर डिझायनर असणारी त्यांची पत्नी शु वेन यांचे देवराज यांचे एकुलते एक अपत्य आहे. देवदान देवराज याच्यावर उपचार करताना 16 कोटी रुपये खर्चून जीन थेरपी पद्धत 'झोलजेन्स्मा' वापरली गेली. हे जगातील सर्वात महागड्या औषधांपैकी एक म्हणून ओळखले जाते. बुधवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये मुलाची आई जू वेन देवराज यांनी सांगितले की, एक वर्षापूर्वी मी आणि माझे पती आमच्या मुलाला चालताना पाहू शकत नव्हतो. त्यावेळी त्याला उभेही राहता येत नव्हते. आता त्याला चालताना पाहणे शक्य आहे. एखाद्याच्या मदतीने त्याने ट्रायसायकल चालवणे देखील चमत्कारासारखे आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अवघ्या 10 दिवसांत सुमारे 30,000 लोकांनी 2 वर्षांच्या देवदानच्या उपचारासाठी 'रे ऑफ होप' या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून एकूण 28.7 लाख सिंगापूर डॉलर्स म्हणजेच सुमारे 16 कोटी रुपये दान केले होते. जेव्हा देवदान 1 महिन्याचा होता, तेव्हा त्याला स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफीचे निदान झाले, त्यामुळे त्याचे स्नायू कमकुवत होते. कालांतराने त्यांची प्रकृती बिघडली. दान केलेल्या मोठ्या रकमेच्या मदतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले असून आता तो थोडासा चालण्यास सक्षम आहे. देवदा देवराजच्या आई-वडिलांना आता आपल्या मुलाला चालताना पाहून खूप आनंद झाला आहे.
हेही वाचा: