Latest

ट्विटरचे पुन्हा सुरू होणार ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन; जाणून घ्या आता किती पैसे भरावे लागतील

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटर आपली सशुल्क प्रीमियम व्हेरिफाईड सेवा 'ट्विटर ब्ल्यू' पुन्हा एकदा लॉन्च करणार आहे. सोमवारी सर्व ट्विटर वापरकर्त्यांसाठी ही सेवा उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात बनावट खात्यांच्या समस्येमुळे ते बंद करण्यात आले होते. ट्विटरने शनिवारी सांगितले की, युजर्स सोमवारपासून त्यांच्या अकाऊंटवर ब्ल्यू टिक्ससाठी ट्विटर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. यासोबत अनेक स्पेशल फीचर्स देखील उपलब्ध असणार आहेत.

मस्क यांनी ट्विटरची खरेदी करण्यापूर्वी फक्त कंपन्या, सरकारी संस्था, प्रसिद्ध लोक आणि पत्रकारांना ब्ल्यू टिक्स दिली जात होती, परंतु मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर त्याचे नाव ट्विटर ब्ल्यू ठेवण्यात आले. त्यानंतर कोणतीही व्यक्ती ८ डॉलर देऊन ब्ल्यू टिक घेऊ शकते. गेल्या महिन्यात ट्विटर ब्ल्यू लाँच झाल्यानंतर जगभरात प्रसिद्ध व्यक्ती, कंपन्या आणि पत्रकारांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर बनावट खाती तयार होत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचवेळी अमेरिकेतील एका फार्मा कंपनीचे बनावट ट्विटर अकाउंट तयार करून एका व्यक्तीच्या वतीने बनावट ट्विट करण्यात आले, ज्यामुळे कंपनीचे नुकसान झाले होते. ब्ल्यू-टिक असलेली बनावट खाती वाढू लागली. ज्यामुळे ट्विटरला त्याची सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत ती निलंबित करावी लागली. यानंतर ट्विटरने या सेवेवर बंदी घातली होती. ट्विटर ब्ल्यू पुन्हा लाँच केल्यानंतर त्याचे सब्सक्रिप्शन चार्जेस जाहीर करण्यात आले आहे. वेब यूजर्सना ट्विटर ब्ल्यूसाठी ८ डॉलर भरावे लागतील. तर अॅपल यूजर्सना प्रति महिना 11 डॉलर सबस्क्रिप्शन शुल्क भरावे लागेल.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT