

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरवरून रवाना झाली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ही वंदे भारत एक्सप्रेस सहावी ट्रेन आहे. नागपूर ते विलासपूर दरम्यान ती धावणार आहे.
'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा'चे (Samruddhi Mahamarg) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर) लोकार्पण होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर रेल्वे स्टेशन येथे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांसोबत फ्रिडम पार्क ते खापरीपर्यंत मेट्रो प्रवास केला.