Latest

Twitter New CEO : मस्क यांचं भलतच ट्विट; नव्या सीईओचा फोटो शेअर करत उडवली खिल्ली…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे (SpaceX) या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि  मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) नेहमी चर्चेत असतात. ट्विटरची  मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आज त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सलग काही फोटो ट्विट करत म्हंटल आहे की,"ट्विटरचा नवा सीईओ आश्चर्यकारक आहे" आणि तो इतर सीईओपेक्षा खूप वेगळा आहे. त्यांच्या या ट्विटवर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. जाणून घ्या कोण आहे ट्विटरचा नवा सीईओ. (Twitter New CEO)

सीईओ पदावरुन पाय उतार व्हावे का?

इलॉन मस्क यांनी १९ डिसेंबरला  आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर  एक पोल घेतला होता. त्यामध्ये त्याने नमूद केले होते की, आपण ट्विटरच्या सीईओ पदावरुन पाय उतार व्हावे का? जो काही निकाल येईल त्याचे मी पालन करेन असेही त्याने सांगितले होते. या पोलवर ५७.५% लोकांनी 'हो' असे उत्तर दिले होते. तर ४०.५ % लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले होते. (२६ डिसेंबर) हे ट्विट करत त्यांनी नव्या सीईओच्या शोधात असल्याचे संकेत दिले होते. मस्क यांच्या या पोलला अनेकांनी कमेंट करत प्रतिसाद दिला होता. अनेकांनी आपण या पदासाठी इच्छूक असल्याचे सांगितले. जगातील सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर मिस्टरबीस्ट यांनीही आपण ट्विटरचा सीईओ होण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. इमेलच्या शोधाचा दावा करणाऱ्या भारतीय-अमेरिकन व्यावसायिक असलेले शिवा अय्यादुराई यांनीही ट्विटरचा सीईओ व्हायची इच्छा व्यक्त केली होती. या संदर्भात त्यांनी ट्विटरला ट्विट करत  इलॉन मस्क यांना टॅग केले होते. 

Twitter New CEO : 'शिबा  इनू' नवा सीईओ?

इलॉन मस्क यांनी आज सकाळी (दि.१६) काही ट्विट करत ट्विटरच्या नव्या सीईओचे फोटो शेअर केले आहेत. हा फोटो आहे तो मस्कच्या 'शिबा इनू' या कुत्र्याचा. तो सीईओच्या खुर्चीवर बसलेल्या स्थितीत आहे.

त्याने फोटोमध्ये फ्लोकी ट्विटर ब्रँडेड ब्लॅक टी-शर्ट घातलेला दिसत आहे ज्यावर सीईओ लिहिले आहे. त्याच्या समोर टेबलावर त्याच्या पंजाच्या ठशांसह काही कागदपत्रेही पडून आहेत. समोर ट्विटर लोगो असलेला एक छोटा लॅपटॉप आहे. फोटो शेअर करताना मस्कने लिहिले की, "ट्विटरचा नवा सीईओ अप्रतिम आहे". दुसर्‍या ट्विटमध्ये, त्यांनी म्हटले आहे की ट्विटरचा नवीन सीईओ "इतर" व्यक्तीपेक्षा खूपच चांगला आहे. मस्क यांच्या या ट्विटचा रोख ट्विटरचे माजी सीईओ पराग अग्रवाल याच्याकडे आहे, असे युजर्सने म्हटले आहे. इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सच्या करारामध्ये कंपनी ताब्यात घेताच मस्कने अग्रवाल यांना काढून टाकले होते. मस्क यांनी हे फोटो शेअर करताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर युजर्सकडून जणू मीम्सचा महापूरच आला. यामध्ये इलॉन मस्क, कुत्रा आणि माजी सीईओ पराग अग्रवाल असे तिघांचे मिम्स खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT