Latest

Twitter: एलॉन मस्क ट्विटरची करणार पुनर्रचना; नोकरकपातीची केली घोषणा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरचा करार करत ४४ अब्ज डॉलरला ते विकत घेतले. ट्विटरची मालकी येताच मस्क यांनी ट्विटरच्या सीईओंसह अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर लगेचच मस्क नोकरकपात करत कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्याच्या योजनेत असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी ट्विटर हातात घेताच कंपनीतील नोकऱ्या कपातीची योजना आखण्यास सुरूवात केली आहे. यांसदर्भात मस्क यांनी नोकरकपातीची घोषणा करत, व्यवस्थापकांना कर्मचाऱ्याच्या यादी तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.

मस्क कंपनीच्या सुमारे ७५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकतात. या प्रक्रियेची प्रत्यक्षात सुरूवात लवकरच म्हणजे १ नोव्हेंबरपूर्वीच होणार असल्याचेही एका अहवालात म्हटले आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या अहवालात मस्क यांनी ट्विटरच्या गुंतवणूकदारांना सांगिकले होते की, ट्विटर हे खाजगी होणार आहे. यामधील येणारा खर्च कमी करण्यासाठी ट्विटरमधील कार्यबल कमी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

ट्विटर हातात येताच मस्क अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. ट्विटरची मालकी येताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल आणि कायदेशीर धोरण प्रमुख विजया गड्डे या दोघांमुळे भारतीयांसह सीएफओ नेड सेगल, जनरल काउंसल आणि सीन एडगेट यांना काढून टाकले. यानंतर ट्विटरवर आता कॉमेडीही कायदेशीर असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

यानंतर एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया ट्विटरवरील कंटेन्ट संदर्भात कंपनी कंटेंट मॉडरेशन कौन्सिल तयार करण्यात येणार असून, ती ट्विटर प्लॅटफॉर्मवर कंटेंट मॉडरेशनशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकेल. मात्र अद्याप कंटेंट संदर्भात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचेही एलॉन यांनी ट्विट करत स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT