Latest

Twitter Blue Tick : एलॉन मस्कने बदलला ब्लू टिक सबस्क्रिप्शन लॉन्च करण्याचा प्लॅन; जाणून घ्या त्यामागचे कारण

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Twitter Blue Tick : ट्विटरवर ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी आठ डॉलर शुल्कासह ब्लू टिक व्हेरिफिकेशनचे री-लाँचिंग थांबवले आहे. रिपोर्टनुसार, लोकांना ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनसाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागेल. जोपर्यंत ट्विटरवरील डुप्लिकेट आयडी बंद करण्यात आले आहे, याची खात्री होत नाही, तोपर्यंत ब्लू टिक व्हेरिफिकेशनचे री-लाँचिंग थांबवत असल्याचे मस्क यांनी सांगितले.

Twitter Blue Tick : एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती की, ब्लू टिक सब्सक्रिप्शन प्लॅन २९ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होईल. पण मस्क यांच्या सोमवारी केलेल्या घोषणेमुळे याला उशीर होऊ शकतो. मस्क यांच्या या योजनेमुळे 'ब्लू टिक' करिता ८ डॉलर प्रति महिना शुल्क आकारावे लागणाऱ्या ग्राहकांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे.

Twitter Blue Tick : वैयक्तिक आणि कंपनीच्या अकाऊंटला स्वतंत्र टिक

ट्विटर वैयक्तिक अकाऊंट पेक्षा संस्था आणि कंपन्यांसाठी वेगवेगळ्या रंगीत टिक्स वापरू शकते. कंपनी त्यावर काम करत आहे. लवकरच या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल, असेही मस्क यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT