कतार वर्ल्डकप 2022 स्पर्धेत ‘केएसए’चा झेंडा फडकणार | पुढारी

कतार वर्ल्डकप 2022 स्पर्धेत ‘केएसए’चा झेंडा फडकणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कतार येथे सुरू असणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फुटबॉल नगरी कोल्हापुरातील शिखर संस्था असणार्‍या कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचा (केएसए) चा झेंडा फडकणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कतार येथे नोकरीच्या निमित्ताने जाणार्‍या अर्शिल समीर मुजावर या पन्हाळगडावरील युवकाने हा निर्धार केला असून तो बुधवारी केएसएचा ध्वज घेऊन कतारला रवाना होणार आहे.

अर्शिल सेंट झेवियर्स हायस्कूल व विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याने अर्शिलने फुटबॉलपटू, अ‍ॅथलिट म्हणून विविध स्पर्धांत सहभाग नोंदविला. पुण्याच्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअर ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. त्याला केएसएचे चिफ पेट्रन शाहू महाराज, अध्यक्ष मालोजीराजे, सचिव माणिक मंडलिक आदींचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button