2035 मध्ये संपुष्टात येईल लीप सेकंद | पुढारी

2035 मध्ये संपुष्टात येईल लीप सेकंद

पॅरिस : ‘लीप सेकंद’ म्हणजेच पृथ्वीवरील वेळेला एक सेकंदाने पुढे करण्याची पद्धत 2035 मध्ये संपुष्टात येईल. फ्रान्सच्या व्हर्सेलीसमध्ये नुकताच याबाबतचा निर्णय सायन्स अँड मेजरमेंट स्टँडर्डच्या आंतरराष्ट्रीय करारातील सदस्य देशांनी घेतला. याबाबतचा प्रस्ताव जवळजवळ सर्वसंमतीने स्वीकारण्यात आला.

जगभरातील वैज्ञानिकांनी, मेट्रोलॉजिस्टनी याबाबत सुटकेचा श्वास सोडला आहे. काही वैज्ञानिक गेल्या काही वर्षांपासून लीप सेकंदाची समस्या सोडविण्यासाठी दबाव निर्माण करीत होते. ही पद्धत 50 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती आणि त्यापासून समस्या निर्माण होत होत्या. इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक टाईम वॉच म्हणजेच आंतरराष्ट्रीय आण्विक घड्याळाशी ताळमेळ साधण्यासाठी ही पद्धत स्वीकारण्यात आली होती.

पृथ्वीची आपल्या अक्षाभोवती फिरण्याची गती अ‍ॅटॉमिक वॉचच्या वेळेपेक्षा थोडी धीमी आहे. त्यामुळे ज्यावेळी आण्विक घड्याळाचा वेळ एक सेकंद पुढे असतो त्यावेळी त्याला पृथ्वीच्या वेळेबरोबर आणण्यासाठी एक सेकंद थांबवण्यात येते. 1972 मध्ये ज्यावेळी बदल करण्यात आला त्यावेळी दहा लीप सेकंद अ‍ॅटॉमिक टाईम स्केलमध्ये जोडण्यात आले. त्यानंतर आणखी 27 सेकंद जोडण्यात आले आहेत.

Back to top button