नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ईशान्य भारतातील त्रिपुरात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप तसेच काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा टाऊन बार्दोवाली मतदार संघातून निवडणूक लढतील. तर, केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक धनपत मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत.
काँग्रेसने देखील १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस नेते सुदीप रॉय बर्मन आगरतळा मधून निवडणूक लढवतील. तर, विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या विरोधात आशिष कुमार साहा यांना काँग्रेसने निवडणूक रिंगणात उतरवले आहे. राज्यातील ६० विधानसभा मतदार संघात १६ फेब्रुवारीला मतदार घेण्यात येणार आहे. २ मार्चला निकाल जाहीर केला जाईल. सोमवारी, ३० जानेवारी पर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करता येईल. ३१ जानेवारीला उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल.
हेही वाचलंत का ?