शासकीय यंत्रणांचा गैरवापर नाही, …मी देखील हेच केले असते : प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य | पुढारी

शासकीय यंत्रणांचा गैरवापर नाही, ...मी देखील हेच केले असते : प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या देशात चाललेल्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एक लक्षवेधक वक्तव्य केले आहे. आपला पक्ष वाढवण्यासाठी आणि सत्ता हातात ठेवण्यासाठी जर मी मोदी असतो तर आज मोदी करतायेत हेच मी केल असतं, असे मत त्यांनी मांडले आहे. कायदेशीर मार्गाने लोकशाहीमध्ये हे करावच लागतं, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सध्या वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांचा विरोधकांना दाबण्यासाठी वापर होत आहे, असे म्हणणे चुकीचे असून ज्यांच्यावर कारवाई होत आहे, ते तसे वागले असल्याचे आंबेडकर म्हणाले. प्रशासकीय कामकाज एका विशिष्ट पद्धतीने चालत असते, त्यामुळे आपण त्याला नाकारू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, काल पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले होते, आपण सर्व भारतीय आहोत, एकाच देशाचे नागरिक आहोत त्यामुळे आपआपसात शत्रुत्व असण्याचे काहीही कारण नाही. राजकीय विचारधारेत मतभेद असू शकतात. त्यामुळे भाजप सोबत टोकाचे मतभेद आहेत पण त्यांच्याशी शत्रुत्व नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रकारे मनुस्मृतीचे दहन केले त्याप्रमाणे जर भाजपने मनुस्मृतीचे दहन केले आणि संविधानाच्या चौकटीत काम करू लागले तर त्यांच्याशीही आघाडी होऊ शकते असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.

हे वचलंत का? 

Back to top button