Latest

Apple Watch Cellular : ‘ॲपल स्मार्ट वॉच तारी त्याला कोण मारी’; स्‍मित सांगतोय स्वानुभव

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अद्ययावत तंत्रज्ञानामुळे तुम्‍ही स्‍मार्ट होताच. त्‍याचबरोबर हे तंत्रज्ञान तुम्‍हाला जीवदानही देते हे वारंवार स्‍पष्‍ट झाले आहे. असाच अनुभव एका १७ वर्षीय मुलाने घेतला आहे. ही घटना घडली आहे महाराष्ट्रात. १७ वर्षीय मुलगा ट्रेकला गेला होता. त्यावेळी तो खोल दरीत पाय घसरुन खोलवर पडला. तेव्हा त्याने आपल्या हातातील ॲपल घड्याळाचा त्‍यानेस्मार्टली वापर केला. याच्‍या माध्‍यमातून कु़टुंबियांशी आणि मित्रांशी संपर्क साधला. या घड्याळातील असलेल कॉलिंग  फिचर (Apple Watch Cellular) वापरलं आणि आपला जीव वाचवला. 

Apple Watch Cellular :  १३०-१५० मीटर खोलवर दरीत कोसळला

एका रिपाेर्टनुसार, १७ वर्षांचा  स्मित मेहता वैद्यकीय शिक्षण घेतो. तो आपल्या काही मित्रांसोबत जुलै महिन्‍यात विसापूर ट्रेकला गेला होता. ट्रेक चांगला झाला. काही फोटो काढले, फिरले आणि परतीला लागले. दरम्यान, जोरदार पाऊस पडत होता. त्याचा अचानक पाय घसरला आणि तो दरीत कोसळला. तो जवळपास १३०-१५० मीटर खोलवर पडला. तो घाटात खोलवर पडला. मित्रांना शोधणे अशक्य झाले. स्मितने एका वाहिनीला  सांगितले की, तो आणखी खोलवर पडला असता; पण तिथे दगड आणि झाड झुडपं असल्‍याने तो बाचवला. 

Apple Watch Cellular : जवळ होतं फक्त घड्याळ 

ट्रेकला निघताना त्याने व त्याच्या मित्रांनी फक्त एक छोटी बॅग घेतली होती. त्यामध्ये फक्त आवश्यक सामान होत. त्यामध्ये  सर्वांचे मोबाईलही होते. स्मितजवळ होत ते त्याचं फक्त ॲपल घड्याळ. त्याने चेक केले असता लक्षात आलं की, त्याच्या घड्याळाला रेंज आहे. त्याने  स्मार्टली त्याच्या घड्याळाचा वापर केला. घड्याळाला जिओ नेटवर्क उपलब्ध होत. त्याच्या या वॉचला कॉलिंगची  Apple Watch (Cellular) सेवा होती. त्याने त्याचा आधार घेवून आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला बचक पथकाने वर काढले. त्यानंतर त्याला लोणावळा  मधील स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

पाच दिवस शस्त्रक्रिया 

स्मितला पुढील वैद्यकीय उपचारासाठी पुण्यातील आर्थोपेडिक हॉस्पिटलला दाखल केले. त्याचे पाय सुजले होते. त्यामुळे त्‍यांच्‍या गुडघ्‍यांवर तब्बल पाच दिवस शस्त्रक्रिया सुरु होती. १६ जुलै २०२२ रोजी शस्त्रक्रिया पूणै झाली. सध्या स्मितची तब्येत चांगली आहे. तो ॲपल वॉचचे आभार मानत आहे.

टीम कुकला ईमेल 

स्मितने ॲपलचा सीईओ टीम कुक यांचेही ईमेलच्‍या माध्‍यमातून आभार मानले. टीमनेही स्मितला ईमेल केला की, "आम्हाला खुप आनंद होतोय की तु दरीतुन परत आलास आणि तुझी तब्येत चांगली आहे."

अशी घटना फक्त स्मित बाबतीतच झाली नाही तर ॲपल वॉचने या अगोदरही युजर्सचे जीव वाचले आहेत. काही महिन्यांपूर्वी, युनायटेड किंगडममधील ॲपल वॉच वापरकर्त्याने सांगितले होते की, "घड्याळाच्या ईसीजी वैशिष्ट्यामुळे हृदयाची गती जास्त होतेय असं लक्षात आल्यावर योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळण्यास मदत झाली आहे."

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT