Latest

Tomato Flu : 5 वर्षाखालील 82 मुले ‘टोमॅटो फ्लू’ ने संक्रमित, कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता ‘टोमॅटो फ्लू’ ची साथ

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोना आणि मंकीपॉक्स यासारख्या संक्रमित आजारानंतर आता देशात 'टोमॅटो फ्लू' (Tomato Flu) आजाराच्या केसेस समोर येत आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 5 वर्षाखालील ८२ मुले संक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. मेडिकल जर्नल द लान्सेट मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामधून याबाबतची माहिती समोर आली आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्वचेवर लाल रंगाच्या खूणा आणि फोडी दिसू लागतात. वास्तविक ही लक्षणे कोरोना, चिकणगुनिया, डेंगू आणि मंकिपॉक्स यासारख्या आजारांमध्ये दिसून येतात. मात्र या आजारात लाल रंगाचे फोड दिसून येत असल्याने याला 'टोमॅटो फ्लू' (Tomato Flu) असे नाव देण्यात आले आहे.

गुजरातच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, मे ते जुलै दरम्यान जवळपास ८२ मुले टोमॅटो फ्लूपासून (Tomato Flu) संक्रमित झालेले आहेत. मात्र या नव्या आजाराशी संबंधित अशी कोणतीही माहिती केरळ सरकार आणि आरोग्य मंत्रालयाद्वारे देण्यात आलेल्या नाही. त्याचबरोबर संशोधकांच्या मतानुसार या आजारामध्ये त्वचेवर लाल खुणा पडण्यास सुरूवात होते.

इन्फ्लुएंजा आजाराशी साधर्म्य दाखवणारी लक्षणे

गुजरातच्या एलएम कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक विवेक पी. चावडा यांनी दिलेल्या माहितीनुसार टोमॅटो फ्लू (Tomato Flu) या आजारामध्ये थकवा, उल्ट्या, ताप, पाण्याची कमतरता, सूज यासारखी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे इन्फ्लुएंजा आजाराशी साधर्म्य दाखवणारी आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT