K. C. Sharma : प्रसिध्द निर्माते के. सी. शर्मा यांचे निधन | पुढारी

K. C. Sharma : प्रसिध्द निर्माते के. सी. शर्मा यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते के सी शर्मा यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले होते. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईतील सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हिंदी चित्रपटससृष्टीतील लेखक शक्तिमान, निर्माता विनोद बच्चन, अभिनेता अली खान, मुश्ताक खान आणि ॲक्शन मास्टर टीनू वर्मा उपस्थित होते. के सी शर्मा यांनी स्वत: बड्या बजेटचे हिट चित्रपट बनवले आहेत.

उत्तर प्रदेशातील ब्रजभूमी मथुरेचे असलेले के. सी शर्मा यांनी मुंबई चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. अनिल शर्मा हा त्यांचा मुलगा होय. हा चित्रपट उद्योगातील दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहे.अनिलने आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या ‘शांतिकेतन फिल्म्स’ साठी ‘श्रद्धांजली’, ‘हुकूमत’ आणि ‘इलान-ए-जंग’ सारखे हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

के सी शर्मा हे त्यांच्या काळातील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बीआर चोप्रा यांच्या खूप जवळ होते. ते मथुरा सोडून मुंबईत आले. बीआर चोप्रा यांच्यासोबत दीर्घकाळ काम केल्यानंतर त्यांनी शांतिकेतन फिल्म्स नावाची स्वतःची निर्मिती कंपनी उघडली. या अंतर्गत त्यांनी ‘श्रद्धांजली’, ‘बंधन कच्चे धागों का’, ‘इलान-ए-जंग’ आणि ‘हुकूमत’ सारखे हिट चित्रपट केले.

दोन वर्षांपूर्वी त्‍यांच्‍या पत्नीचे निधन झाले हाेते.  कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केसी शर्मा यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

हेदेखील वाचा-

 

Back to top button