Third -hand smoke : सावधान..! ‘थर्ड-हँड स्मोक’ आहे स्मोकिंग इतकेच घातक… जाणून घ्‍या सविस्‍तर

Third -hand smoke : सावधान..! ‘थर्ड-हँड स्मोक’ आहे स्मोकिंग इतकेच घातक… जाणून घ्‍या सविस्‍तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : धुम्रपान (स्‍मोकिंग) हे व्‍यसन जीवघेणे आहेच त्‍याचबरोबर धुम्रपान करणार्‍यांच्‍या थेट संपर्कात येणार्‍यांनाही कॅन्‍सरचा धोका असतो, हे यापूर्वीच संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. मात्र आता थर्ड-हँड स्‍मोकचा ( Third -hand smoke ) धोकाही तेवढाचा घातक असल्‍याचे कॅलिफोर्निया येथील लॉरेन्‍स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीतील झालेल्‍या संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. यामुळे धुम्रपान न करणार्‍यांनाही फुफ्‍फुसाचा कॅन्‍सर होण्‍याचा धोका वाढतो, असे संशोधकांनी नमूद केले आहे.

'थर्ड-हँड स्मोक' म्‍हणजे काय ?

धुम्रपान करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात येणार्‍याला सेकंड हँड स्‍मोकर्स म्‍हणजे पॅसिव्‍ह स्‍मोकर्स असे म्‍हटले जाते. आजपर्यंत धुम्रपान करणारे आणि त्‍याच्‍या संपर्कात थेट येणारे सेकंड हँड स्‍मोकर्स यांनाच फुफ्‍फुसाचा कर्करोग होण्‍याचा धोका
असल्‍याचे यापूर्वीच्‍या संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहेच. थर्ड हँड स्‍मोक याचा अर्थ धूम्रपान केल्‍यानंतर घातक केमिकल्‍सच्‍या संपर्क येणे. म्‍हणजे ज्‍या ठिकाणी धूम्रपान केले गेले आहे. अशा ठिकाणच्‍या वस्‍तू उदा. कपडे किंवा सोफासेट, बेटशीट इत्‍यादी.

थर्ड हँड स्‍मोक मध्‍ये सिगारेटमध्‍ये असलेल्‍या घातक रसायनाशी ही पृष्‍ठभाग व वस्‍तूच्‍या माध्‍यमातून तुमच्‍या शरीरात जातात. याचा अर्थ तुम्‍ही धुम्रपान करत नसला तरी थर्ड हँड स्‍मोकमुळे तुम्‍हाला फुफ्‍फुसाचा कॅन्‍सर होण्‍याचा धोका
असल्‍याचे कॅलिफोनिर्यया येथील लॉरेन्‍स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीतील तज्‍ज्ञांनी आपल्‍या संशोधनात नमूद केले आहे. सिगारेटमधील घातक केमिकल्‍सच्‍या संपर्कात आलेल्‍या उंदरांच्‍या त्‍वचेवर निकोटीनचा प्रभाव राहिल्‍याचे संशोधनात स्‍पष्‍ट झाल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Third -hand smoke : आरोग्‍याला दीर्घकालीन धोका

सिगारेटच्‍या धुराचा नेमका कसा परिणाम होतो यावरील संशोधनाबाबत लॉरेन्‍स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीतील डॉक्‍टरांनी
स्‍पष्‍ट केले की, "थर्ड-हँड स्मोक' मुळे दीर्घकालीन आरोग्‍याचे धोका निर्माण होवू शकतो. जेव्‍हा एखादा व्‍यक्‍ती धुम्रपान करते तेव्‍हा त्‍यातील बहुतांश भाग हा त्‍याच्‍या संपर्कात येणार्‍याच्‍या फुफ्‍फुसात जात नाही तर सभोवतालच्‍या हवेत पसरतो. तो तुम्‍ही वापरत असलेले कपडे आणि बिछाना अशा अनेक वस्‍तूंना बाधित करतो. अशा वस्‍तू हाताळणार्‍यांच्‍या आरोग्‍याला धुम्रपान करत असलेल्‍या व्‍यक्‍ती एवढाचा धोका संभवतो."

कर्करोगास कारणीभूत ठरणार्‍या संयुगावर संशोधन

संशोधकांनी तंबाखूच्‍या धुरातील विशिष्‍ट अशा नायट्रोसामाइन्‍सचा या कर्करोग निर्माण करणार्‍या संयुगाचे संशोधन केले. यावेळी असे आढळले की, हे संयुग हे पृष्‍ठभागावीरल विषारी आणि नायट्रस ॲसिड शोषून घेतात आणि त्‍यामुळे 'थर्ड-हँड स्मोक'चा धोका वाढतो. यासंदर्भात बर्कले प्रयोगशाळेतील संशोधन टीमचे प्रमुख शियाओचेन टँग यांनी म्‍हटले आहे की, "धूम्रपान करताना निकोटीन मोठ्या प्रमाणात सोडले जाते. ते मानवी त्‍वचेसह घरातील विविध वस्‍तूंच्‍या पृष्‍ठभागावरही पसरते. पृष्‍ठभागावरील त्‍वचेचे तेल आणि घामाच्‍या संपर्कात आल्‍याननंतर नायट्रोसामाइन्‍सचे उत्‍पादन जास्‍त होत असल्‍याचे आढळले आहे. यामुळे कॅन्‍सरचा धोका वाढतो."

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news