Latest

Titanic tourist submarine : टायटॅनिकचे अवशेष पहायला गेलेल्या पानबुडीत पाकिस्तानच्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील प्रसिद्ध जहाजापैकी एक असलेले टायटॅनिक जहाज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अटलांटिक महासागरात बुडालेल्या या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी रविवारी (दि. १८) पाच पर्यटक पाणबुडी घेऊन गेले होते. मात्र ही पाणबुडी अचानक बेपत्ता झाली. बुडालेल्या या पानबुडीमध्ये पाकिस्तानातील (Pakistan Richest Person) सर्वात श्रीमंत व्यक्ती शहजादा दाऊद (Shahzada Dawood) आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद (Suleman Dawood) असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. (Titanic tourist submarine)

OceanGate Expeditions द्वारे संचालित 21-foot (6.5-meter) टुरिस्ट क्राफ्टने रविवारी पानबुडीचा शोध सरु केला. या पर्यटक पाणबुडीचे नाव टायटन असून समुद्रात गेल्यानंतर अडीच तासांत या पानबुडीचा संपर्क तुटला. टूर कंपनी Oceangate च्या मते, या छोट्या पाणबुडीवर एकूण पाच जण होते. यापैकी पाकिस्तानमधील श्रीमंत व्यक्ती सलमान दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद या पानबुडीमध्ये असल्याची माहिती कंपनीने दिली. केवळ 96 तास ऑक्सिजन पुरवठा होऊ शकेल इतकी क्षमता पानबुडीची आहे. त्यामुळे बुडालेल्या या पाणबुडीतील ऑक्सिजन कमी होत असल्याचा अंदाज कंपनीने वर्तविला आहे. त्यामुळे पानबुडी घेऊन गेलेल्या पाचही जणांचे जीव धोक्यात आहेत असे कंपनीने म्हटले आहे. (Titanic tourist submarine)

आपत्कालीन परिस्थितीत या पाणबुडीमध्ये (Submarine) साधारणपणे चार दिवस ऑक्सिजन असतो, असा कंपनीचा दावा आहे. पाणबुडी गायब झाल्यानंतर आता अनेक सरकारी संस्था, यूएस-कॅनडा नेव्ही फोर्स आणि व्यावसायिकदृष्ट्या समुद्राच्या खोलात जाणाऱ्या कंपन्या या पाणबुडीचा शोध घेत आहेत. (Missing tourist)

शहजादा दाऊद पाकिस्तानमधील प्रतिष्ठित व्यक्ती

शहजादा दाऊद हे पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. 2003 मध्ये ते एन्ग्रो कॉर्पोरेशन बोर्डाचे सदस्य झाले आणि सध्या ते उपाध्यक्षपदावर आहेत. महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क आणि संपर्क प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचा गौरव केला जातो.

दाऊद ग्रुपचा एक भाग असलेल्या दाऊद हर्क्युलस कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष म्हणून शहजादा हे एका शतकाहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांचा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. १९९६ मध्ये ते या व्यवसायात सक्रीय झाले. त्यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि पाकिस्तानमधील उद्योगांच्या पुनरुज्जीवनामध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT