टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या लोकांची पाणबुडी बेपत्ता | पुढारी

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या लोकांची पाणबुडी बेपत्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क : टायटॅनिकच्या अवशेषांजवळून एक व्यावसायिक पाणबुडी बेपत्ता झाली आहे. स्काय न्यूजने आपल्या वृत्तात याची पुष्टी केली आहे. मात्र, बेपत्ता विमानात किती लोक होते याची पुष्टी अद्याप झालेली नाही. टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी ही पाणबुडी अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे. बोस्टन कोस्टगार्डने मीडिया आउटलेटला सांगितले की सध्या, शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, १४ एप्रिल १९१२ रोजी उत्तर अटलांटिक महासागरातील हिमखंडाशी टक्कर होऊन टायटॅनिक जहाजाचे दोन तुकडे झाले आणि ते बुडाले. टायटॅनिक बुडल्यामुळे १५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. १० एप्रिल रोजी हे जहाज ब्रिटनच्या साउथॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्कच्या प्रवासाला निघाले होते, ते अपघाताचे बळी ठरले होते.

हेही वाचलंत का?

Back to top button