Latest

Tiger 3 ची टीजर रिलीज डेट समोर, सलमान खान जारी करणार ‘टायगरचा मेसेज’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा आगामी चित्रपट 'टायगर-३' ची  टीझर रिलीज डेट समोर आलीय. फॅन्सची प्रतीक्षा आता संपली आहे. जवळपास ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज होण्याची प्रतीक्षा फॅन्सना लागून राहिली आहे. २७ सप्टेंबर रोजी 'टायगर-३' चा टीझर व्हिडिओ रिलीज केला जाईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी टीझर व्हिडिओला 'टायगर का मेसेज' असं नाव दिलं आहे. यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने रिलीज होणारा सलमान खानच्या चित्रपटाचे काही पोस्टर आतापर्यंत रिलीज केले गेले आहेत. आता टीझर व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा 'टायगर-३' ची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चित्रपटामध्ये सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT