Latest

पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यातील तिघे लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : येरवडा पोलिस ठाण्यातील तिघे लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी तिघांनी वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड्यांची 13 हजार रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदार राजेंद्र दिक्षित याला रंगेहाथ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तर पोलिस हवालदार जयराम सावलकर आणि विनायक मुधोळकर या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी तिघे पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून तक्रारदार यांचे कारच्या झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस हवालदार जयराम सावळकर, विनायक मुधोळकर आणि राजेंद्र दीक्षित यानी तक्रारदारांकडे 13 हजार रुपयांची लाच मागणी करून ती लाच रक्कम राजेंद्र दीक्षित यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे स्वीकारल्यावर त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून,येरवडा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT