सुनेवर अत्याचारप्रकरणी निवृत्त डीवायएसपीवर गुन्हा | पुढारी

सुनेवर अत्याचारप्रकरणी निवृत्त डीवायएसपीवर गुन्हा

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : आपल्याच सुनेवर अत्याचार करणार्‍या सेवानिवृत्त डीवायएसपीविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित सुनेने फिर्याद दाखल केली आहे.

सेवानिवृत्त डीवायएसपीचा शिक्षक असलेल्या मुलाबरोबर पीडितेचा गेल्यावर्षी रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. पीडिता ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यामुळे तिला महाविद्यालयात तिचे सासरे सेवानिवृत्त डीवायएसपी हे कधी चार चाकी गाडीत, तर दुचाकी गाडीवरून सोडत होते.

ऑगस्ट 2022 मध्ये सेवानिवृत्त डीवायएसपी यांनी घरात एकट्याच असलेल्या सुनेवर अत्याचार केला व याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. त्यामुळे ही बाब पिडीत सुनेने कुणालाही सांगितलेली नाही. याचा गैरफायदा घेत सासर्‍याने पुन्हा सुनेवर अत्याचार केला. त्यामुळे पिडीत सुनेने ही बाब आपल्या पतीला सांगितली असता तिच्या पतीने तिलाच मारहाण करून माहेरी हाकलून दिले. त्यामुळे माहेरी राहात असलेल्या पिडीतेला सासरच्या मंडळींनी पुन्हा नांदविण्यास नेले नाही. अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक हनपुडे -पाटील करीत आहेत.

Back to top button