Latest

युक्रेन सीमेवर हजारो मुलांची आईवडिलांपासून ताटातूट; आक्रोश आणि हुंदका थांबेना (photos)

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक नेत्यांच्या राक्षसी महत्त्वकांक्षेमध्ये भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्यांचा आणि उर्वरित जगाशी काहीही संबंध नसलेल्यांचाच नेहमीच जीव जात असतो. युद्धखोर मानसिकता सुद्धा त्याचेच प्रतीक असते.

रशियाने आपल्या सामरिक महत्त्वकांक्षेसाठी युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईचा आज सहावा दिवस आहे. रशियाची कोंडी करण्यासाठी चौफेर प्रयत्न सुरु असले, तरी रशियाने युक्रेनवर दिवसागणिक आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. रशियाच्या राक्षसी प्रवृत्तीने युक्रेनमधील जनता मात्र होरपळली गेली आहे. त्यामुळे जीवाच्या आकांताने ते मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

रेल्वे स्टेशनवर एका लहानग्याच्या रडण्याने सर्वांच्याच डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

रोमानिया सीमेवर अनेक स्वयंसेवकांकडून युक्रेनियन मुलांची काळजी घेण्यात येत आहे. अनेकजण देश सोडून जाण्यासाठी रोमानियाच्या सीमेवर जमले आहेत. निर्वासितांचे लोंढे सीमांवर येऊन पोहोचले आहेत. निर्वासितांनी पोलंड सीमेपासून ४३ माईलवर असलेल्या रेल्वे स्टेशनवर देश सोडण्यास गर्दी केल्याने चेंगराचेंगरी होईल अशी स्थिती झाली आहे.

दुसरीकडे पोलंडमधील प्रेझेमिसलमध्ये युद्धात सहभागी होण्यासाठी हजारों युक्रेनियनच्या रांगा लागल्या आहेत. त्यामधील एक ४२ वर्षीय सर्जेई मोतोरोव म्हणाले की, युक्रेनमध्ये जे काही चाललं आहे ते पाहून मी माझ्या मुलीला आणि अन्य कुटुंबातील सदस्यांना इथचं ठेवत आहे, पण मी युक्रेनमध्ये लढण्यासाठी जात आहे. माझ्या देशात जे काही चाललं आहे ते पाहून मी शांत बसू शकत नाही.

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT