Latest

SC sought report on Manipur : मणिपूरसंदर्भात वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमधील वांशिक हिंसाचार थांबविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर सरकारला दिले आहेत.  (SC sought report on Manipur)
मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार सुरु आहे. हिंसाचारामुळे असंख्य लोक बेघर झाले असून त्यांना पुनर्वसन केंद्रात आसरा घ्यावा लागलेला आहे. दुसरीकडे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांबरोबरच लष्कराला तैनात करण्यात आलेले आहे. राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणण्याबरोबर लोकांना दिलासा देण्यासाठी कोणकोणते उपाय केले जात आहेत, याची सविस्तर माहिती सादर करा, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. (SC sought report on Manipur)
राज्यातील स्थिती सुधारत असल्याचे केंद्र तसेच मणिपूर सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणी दरम्यान सांगितले. हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी पोलीस, मणिपूर रायफल्स, सीएसीएफचे जवान व लष्कराच्या 114 तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT